Friday 12 January 2018

ऋतुनिवृत्तीच्या समस्या
मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणे. साधारणपणे 40 ते 50 वयोगटामध्ये स्त्रियांची पाळी बंद होते. याचाच अर्थ स्त्रियांची प्रजननक्षमता संपते. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासून सुरू झालेले मासिक पाळीचे चक्र थांबते.
कारणे आणि लक्षणे- वयाच्या चाळीशीनंतर स्त्रियांच्या शरीरात काही विशिष्ट बदल घडून येतात. संपूर्ण अंतःस्रावी ग्रंथीच्या साखळीची लय बिघडते. विशेषतः जननग्रंथी, थॉयरॉईड ग्रंथी, पीयुषिका ग्रंथी यावर तयाचा जास्त परिणाम होतो.
काही स्त्रियांना रजोनिर्वत्तीच्या काळात फारसा त्रास जाणवत नाही. फक्त मासिक स्राव बंद होतो. पण बहुतेक स्त्रियांना अचानक घोम 2येणे, दडपण वाटणे छातीत धडधडणे अशी लक्षणे जाणवायला लागतात. इच्छा कमी होणे, उदासीनता वाढणे, डोके दुखणे किंवा बधीर होणे, भोवळ येणे, थकवा येणे अशा तक्रारी जाणवू लागतात.
स्त्रियांच्या शरीरात एस्ट्रोजेन नावाचे एक महत्वाचे हार्मोन असते. परंतु रजोनिवृत्तीच्या काळात बिजांडाकोषाची क्षमता कमी होते. तसेच एस्ट्रोजेनची पातळीसुध्दा कमी होऊ लागते. त्यामुळे स्त्रियांना वर सांगितलेल्या शारीरिक समस्या जाणवू लागतात. डिंब ग्रंथीच्या (र्जींरीू) कामात कुठल्याही कारणाने अडथळे आले तरी वरील लक्षणे स्त्रियांमध्ये जाणवतात. 
उपचार-
होमिओपॅथी- रजोनिवृत्तीचा हा काळ अनेक स्त्रियांमध्ये न्यूनगंड निर्माण करतो. आपले अस्तित्व संपले असा काहीसा विचार अशा स्त्रियांमध्ये दिसून येाते. परंतु ही तर खरी आयुष्याच्या सेकंड इनिंगची सुरूवात असते. स्वतःला जास्त त्रास करून न घेता येणारे आयुष्य स्वीकारत मस्त एन्जॉय करायचे असे मनाशी ठरवले तर खूपशा गोष्टी सुसह्य होतात. अशीच एक रूग्ण जिला मेनोपॉजच्या काळात कशाचाच इंटरेस्ट वाटेना. अगदी अचानक एकदम अलिप्तच वागणं झाले. आधीच बारी शिडशिडीत. त्यात खाण्यापिण्याचीही इच्छा राहिली नाही. चक्कर यायची, अंग एकदम गरम तर एकदम थंड असे प्रकार व्हायचे. कुणी समजुतीच्या गोष्टी सांगितल्या तर तिला काहीच पटायचं नाही. तर या स्त्रीला ’सेपिया’ नावाच्या औषधाचा फक्त एक डोस दिला अर्थात जास्त शक्तीचा! बरोबर एक महिन्यातच एकूण एक तक्रारी कमी झाल्या. 
लॅकेसीस- उदासिनता, चिडचीड, अतिशय बाष्कळ बडबड करणे, कपड्यांचासुध्दा स्पर्श सहन न होणे, अचानक अंग फुगल्यासारख होणे, काळपट रक्तस्रााव होणे, डोकेदुखी, चक्कर, मूळव्याध असे त्रास असल्यास उपयुक्त.
पल्सेटिला- अतिशय मवाळ रडवा स्वभाव, तहान अजिबात लागत नाही. क्षणात एक तक्रार तर दुसर्‍या क्षणाला दुसरेच काहीतरी होत असते. सतत मोकळ्या हवेत जावेसे वाटते. आपल्या तक्रारी कोणाला तरी सारख्याच सांगत बसावे असे वाटते.
प्लॉटिना- सतत दुसर्‍यांना नावं ठेवणे, कमी लेखणे, स्वतःचाच तोर मिरवणे, मानसिक त्रास व शारीरिक त्रास आलटून पालटून होत राहणे, अशा स्त्रियांना उपयुक्त.
अशी होमिओपॅथीमध्ये आश्‍चर्यकारक औषधे उपलब्ध आहेत. शिवाय कोणत्याही औषधांचा दुष्परिणाम नाही. परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतल्याने अपेक्षित परिणात साधता येतो.
पुष्पौषधी- मानसिक व आत्मिक संतुलनासाठी वॉलनट, स्क्लिरँथस, इंपेशन्स, हॉर्नबिम, जेनशियन, लार्च अशी पुष्पौषधे वापरता येतात. आयुष्यातील बदलाला सामोरे जाण्यासाठी वॉलनट हे औषध फार उपयुक्त आहे.
नॅचरोपॅथी
बीट- कृत्रिम हार्मोन्स घेण्यापेक्षा बीटचा रस दररोज घेतल्याने कायमस्वरूपी उपयोग होतो. बिटचा पाऊण कप रस प्यावा.
गाजराच्या बिया- रजोनिवृत्तीच्या दडपणाच्या तक्रारींवर गाजराच्या बियांचा उपचार उपयुक्त ठरतो. गाईचे दूध एक पेला घेऊन त्यात एक चमचा गाजराच्या बिया घालाव्यात. दहा मिनिटे उकळावे. रोज असे दूध पिल्याने गुण येतो.
ज्येष्ठमध- ज्येष्ठमधात एस्ट्रोजेन हे हार्मोन असते. रोज एक लहान चमचा ज्येष्ठमधाची पूड खाल्ल्याने फायदा होतो.
जटामानसी- रोज 2 ग्रॅम जटामानसीची पूड खाल्ल्याने मन शांत राहते. आहार- एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. कॅल्शियम एकजीव होण्याठी ‘ड’ जीवनसत्व आवश्यक असते. म्हणून 1000 युनिटस् ड जीवनसत्व, 50 मि. ग्रॅ. मॅग्नेशियम व 1 ग्रॅम कॅल्शियम युक्त गोळ्या घ्याव्यात. 1 लिटर दुधातून 2 ग्रॅम कॅल्शियम मिळते. रजोनिवृत्तीमध्ये ‘ई’ जीवनसत्वांची परिपूर्ण आहार घ्यावा. कच्ची पण मोड आलेली कडधान्ये, सुका मेवा, प्रक्रिया न केलेले उत्तम प्रतीचे दूध, घरी तयार केलेले पनीर अवश्य खावे. प्रक्रियायुक्त कृत्रिम, कोंडाविरहित आहार टाळावा.
इतर उपया
रोजचे चालणे, पोहणे, योगासने, प्राणायाम यांचा अवलंब करावा. येणारे वृध्दत्व खुल्या मनाने स्वीकारून मानसिक, भावनिक ताणतणाव टाळावेत. पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी

No comments:

Post a Comment