वंध्यत्व
प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये आपली संतती निर्माण करावी ही इच्छा उपजतच असते. मनुष्यप्राण्यामध्ये नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये ही इच्छा जास्त प्रबल असते. परंतु मानवाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही. निसर्गाचा नियमच आहे. 100 लग्नांमध्ये 5 जोडप्यांच्या वाट्याला वंध्यत्व येते. मुख्य प्रश्न आहे तो वंध्यत्वामुळे येणार्या सामाजिक कौटुंबिक, धार्मिक रूढींच्या समस्येचा! मूल होण्यासाठी राजा दशरथानेसुध्दा पुत्रकामेष्टी जज्ञ केला होतो. मुलांसाठी मानवतसारखे हत्याकांड होते. मूल न होणार्या जोडप्याची विशेषतः स्त्रीची समाजात फार अवहेलना होते. म्हणूनच वंध्यत्व या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे त्या स्त्रीस दोषी ठरवण्याआधी गर्भाची निर्मिती कशी होते आणि त्यामागे शास्त्रीय दृष्टीकोन काय आहे हे पाहणे महत्वाचे!
गर्भ निर्मितीसाठी प्रमुख्याने तीन गोष्टी लागतात. पुरूष बीज व स्त्री बीज यांच्या संयोगाने गर्भ निर्माण होणे, गर्भ गर्भाशयात रूजणे व नऊ महिन्यापर्यंत पोसला जाऊन वाढणे, नंतर पूर्ण वाढीचे बाळ जन्माला येणे, या नैसर्गिक क्रियेमध्ये कोठेतरी अडथळा अथवा विकार उत्पन्न झाल्यास गर्भधारण होत नाही. सर्वसाधारण 5 ते 10 टक्के जोडप्यांमध्ये ही समस्या असते. बहुतेक जोडप्यांना मूल होण्यासाठी काही महिने प्रयत्न करावे लागतात. साधारणतः एक वर्षात बहुतांश जोडप्यांना यश येते म्हणून एक वर्ष वाट पाहून एक वर्षाच्या प्रयत्नानंतरसुध्दा दिवस राहिले नाहीत तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणी व सल्ल्याची गरज आहे, असे समजण्यास हरकत नाही.
मूल हवे असणार्या पती पत्नी दोघांचीही वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. पव्रथमतः मूल होत नसेल किंवा पहिले मूल असून नंतर मूल होत नसेल तरीही सर्व तपासण्या करून घेणे सोयीस्कर असते. कारण काळ, परिस्थिती, विकार व्याधींमुळे दोघांमध्येही बदल होऊ शकतात. जननेंद्रियांमध्ये, जननक्षमतेंमधेसुध्दा बदल होऊ शकतो. म्हणून तपासणी वेळी पती पत्नी दोघांनीही उपस्थित असणे आवश्यक असते.
वंधत्वाची कारणे
पुरूषांमधील विकार-
1. पुरूषबीजांचा पूर्ण अभाव
2. पुरूषबीजाचे प्रमाण कमी असणे
3. पुरूषबीजाची मंद हालचाल
4. नपुसंकत्व किंवा रचनात्मक दोष असणे
स्त्री विकार-
1. स्त्री बीज तयारच न होणे
2. स्त्री बीज अनियमित तयार होणे (पीसीओडी)
3. स्त्री पुरूष संबंधाबाबात अज्ञान
4. योनी मार्गाची सूज, गर्भाशय मुखाची सूज
5. गर्भाशयाची वाढ अपूर्ण असणे. (गर्भाशय जन्मजातच नसणे.)
6. गर्भाशयातील सूज (टी. बी., फायब्रॉईड, गाठी असणे.)
7. गर्भनलिका बंद असणे.
8. हार्मोन असंतुलन
9. अनाकलनीय वंध्यत्व. अर्थात सगळे काही नॉर्मल असूनही मूल न होणे.
ज्या जोडप्याला मूल होत नाही त्या दोघांच्याही वैद्यकीय तपासण्या करताना पुरूषाची तपासणी करून घेणेसुध्दा जरूरीचे असते. अजूनही आपल्या समाजात फक्त स्त्रीवर वंध्यत्व लादले जाते. फक्त तिलाच दोषी ठरवले जाते. या तपासण्या करण्यामागे डॉक्टरांचा हेतू त्या जोडप्याच्या जननक्षमतेचे पूर्ण मूल्यांकन करणे हा असतो.
पुरूषांसाठी
1. पुरूष वीर्य तपासणी (सिमेन अॅनालायसिस)
2. रक्ततपासणी, विशेषतः गुप्तरोगासाठी
स्त्रीसाठी
1. बीजनिर्मिती पडताळणी- सोनोग्राफी ओव्हेरियन फॉलिकल मॉनिटरिंग- अर्थात स्त्रीबीज वाढीसंंबंधी तपासणी
2. फॅलोपियन ट्युब परीक्षा (बीजवाहक नलिका)- लॅप्रोस्कोपी/ हिस्टरोस्कोपी- दुर्बिणीच्या सहाय्याने पोटातून किंवा गर्भाशयातून विशेष तपासणी करणे.
हिस्टेरोसाल्फिगोग्राफी- विशिष्ट रंग औषधे गर्भाशात सोडून काढलेला एक्स-रे. यावरून गभार्पशातील व बीजवाहक नलिका यातील दोष व अडथळे समजून येतात.
3. गर्भाशयातील अंतर्त्वचेचा पोत व रक्तवाहिन्या सक्षम आहेत का नाहीत हे पाहिले जाते.
4. संप्रेरकाचा समतोल आहे किंवा नाही हे ‘हार्मोनल अॅसे‘ वरून समजते.
5. इतर काही विशिष्ट तपासणी (इम्युनोेलॉजिकल टेस्टस्)
या सर्व तपासण्या केल्यावर दोष कळून येतो. परंतु या सर्व तपासण्या एकाच वेळी करता येत नाहीत. त्या विशिष्ट वेळीच कराव्या लागतात. 5 टक्के जोडप्यांमध्ये सगळ्या टेस्टस् नॉर्मल असूनही त्यांना मूल होत नाही. याला अनाकलनीय वंध्यत्व म्हणतात.
शारीरिक दोष, शारीरिक कमजोरी, इंद्रियांच्या कार्यातील न्यूनता या कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. काही विशिष्ट आजारांमुळे शरीर कमजोर बनते. परमा, गरमी, बीजवाहक नलिका दाह, पंडुरोग, मुलाला जन्म देणार्या इंद्रयांची क्षमता कमी झाल्यामुळे, बीजग्रंथीचे कार्य बिघडल्यामुळे, लठ्ठपणामुळे वंध्यत्व येऊ शकते. भावनिक ताणतणाव, दडपण, मानसिक दुर्बलता, भीती काळजी ही कारणे वंध्यत्वाला आमंत्रण ठरतात.
होमिओपॅथीक उपचार- स्त्री पुरूषांच्या वंध्यत्वकारणानुसार तसेच प्रकृतीमानानुसार उपचार करता येतात. वानगीदाखल काही उदाहरणे देता येतील.
1. व्हिबर्नम ओप्यलस- गर्भाशयाचा दाह, गर्भधारणा झाल्यावर पहिल्या पंधरा दिवसातच गर्भपात होणे, अतिशय अशक्तपणा.
2. कोनियम- स्त्रीबीजकोषामध्ये अर्धवट वाढीची बीजे साटठून राहणे, पांढरा, चिकट प्रदर, गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला दुखणे, मासिक पाळभच्या आधी व पाळीच्या वेळी स्तनामध्ये दुखणे, चक्कर येणे.
3. प्लंबम मेट- मासिक पळी अतिशय अनियमित, उशिरा येणे, स्राव अत्यंत कमी असणे, गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक हार्मोन्सची कमतरता.
4. मँड्रागोरा- कोणत्याही प्रकारचा दोष नसताना येणारे अनाकलनीय वंध्यत्व.
5. अॅग्नसकॅस्टर्स- पुरूषांमधील दोषासाठी
6. सबल सेरूलाटा- शुक्रजंतूच्या बलवर्धनासाठी उपयुक्त.
होमिओपॅथी हे एक अनुभवसिध्द वैद्यकशास्त्र आहे. याची उपयोग फक्त वाचून ऐकून करता येण्यासारखा नाही. त्यासाठी अनुभवी- तज्ज्ञांची मदत घ्याचवीच लागते. तरच अपेक्षित परिणाम साधता येतात. या उपचारांनी अगदी चाळीशी जवळ आलेल्या जोडप्यांनाही अपत्यप्राप्ती झालेली आहे. लग्न होऊन 15-20 वर्षे होऊनही निराश दांपत्यांना खचितच गुण येऊ शकतो.
निसर्गोपचार
1. वडाची मुळे- जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये कुठलाही जन्मजात दोष नसतो तेव्हा वडाच्या कोवळ्या मुळांचा उपचार उपयुक्त असतो. मुळे सावलीत वाळवून पूड करावी. 20 ग्रॅम पूड पाऊण कप दुधातून रोज रात्री असे तीन रात्री हे मिश्रण घ्यावे. हा उपचार मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून करावा. दर महिन्याला हा उपचारा करावा.
2. जांभळाची पाने- स्त्रीबीज ग्रंथीमध्ये दोष असेल तर जांभळाच्या पानाचा काढा गुणकारी आहे. 20 ग्रॅम ताजी पाने पाव लिटर पाण्यात उकळावीत. आटवून दोन चमचे मध किंवा 200 मिली ताक मिसळून हा काढा प्यावा.
3. विंटरचेरी- वंध्यत्वावर ही वनस्पती गुणकारी आहे. 6 ग्रॅम पूड कपभर दूधातून मासि पाळीनंतर पाच ते सहा दिवस रात्री प्यावे.
योगासने- प्रजनन अवयवांचे कार्य चांगल्या पध्दतीने होण्यासाठी सर्वांगासन, मत्स्यासन, अर्धमत्स्येंद्रियासन, पश्चिमोत्तासन, शलभासन ही आसने उपयोगी पडतात.
उत्तम आहार, उत्तम विहार, स्वच्छतेची सवय माफक विश्रांती व उत्साहपूर्ण जीवन जगण्याची इच्छा, होमिओपॅथीक उपचार या उपायांनी वंध्यत्वावर मात करता येते.
जननकोषदाह
(झशर्श्रींळल ळपषश्रराारीेीूं ऊळीशरडएड- झखऊ)
गर्भाशय, उजवी व डावी बीजवाहक नलिका, आजूबाजूला असणारे बीजकोष, योनीमार्ग अशा समूहाला जननकोष म्हणता येते आणि या भागांच्या दाहाला जननकोषदाह असे एकत्रित संबोधता येते.
कारणे
1. गर्भपात झाल्यामुळे, गर्भाशय मुख रूंद झाल्यामुळे जंतूसंसर्ग होतो.
2. प्रसूतीपश्चात अस्वच्छतेमुळे किंवा चिमटा वगैरेंनी प्रसूती केल्यानंतर जंतूसंसर्ग होऊन दाह होतो.
3. गर्भनिरोधकाच्या वापरामुळे दाह होतो.
4. हार्मोन्सच्या उतारचढावामुळे बीजकोषात पाण्याच्या किंवा रक्ताच्या गाठी तयार होऊन दाह होऊ शकतो.
5. गर्भाशयात गाठी होणे, कर्करोग होणे, जननकोषाचा क्षण इ. कारणास्तव दाह होऊ शकतो.
6. गर्भाशय भ्रंश अर्थात अंग बाहेर पडणे हेसुध्दा क्वचित कारण ठरू शकते.
लक्षणे
कारणापरत्वे लक्षणे आढळून येतात. साधारण ताप येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, कंबर व ओटीपोटात दुखणे ही सामान्य लक्षणे आढळून येतातच, शिवाय क्वचित खाज, कंड पडणे, पोटात एकसारखी कळ येणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखणे, पाय मांड्या भरून येणे, अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तक्रारी जाणवणे अशी विशिष्ट लक्षणेही दिसून येतात. अंगावर रक्तस्राव खूप प्रमाणात जाऊन अॅनेमिया होऊ शकतो. मलावरोध, मळमळ, उलट्या होणे अशी लक्षणेही जाणवू शकतात. अशा स्त्रीला वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. क्वचित वंध्यतवही येते.
निदान
प्राथमिक निदान हे फक्त लक्षणे व शारीरिक तपासणी यावरून होतेच. परंतु ठोस निदान होण्यासाठी सोनोग्राफी, पेशींची उतीसमूहाची तपासणी आवश्यक असते.
रक्त व लघवीची जोडतपासणी निदान पक्के करण्यासाठी करणे आवश्यक ठरते.
उपचार-
होमिओपॅथी- उपचारांमध्ये सर्वच ’पॅथी’ ची मदत घ्यावी लागते. परंतु परिपूर्ण शास्त्र फक्त होमिओपॅथीच आहे. कारण विकाराची कारणमीमांसा, लक्षणमीमांसा, व्यक्ती पडताळणी झाल्याशिवाय उपचार करता येत नाहीत. आणि थातूनमातूर उपचाराला जागाच राहत नाही. व्यक्तीविशिष्ट औषधे दिल्यामुळे व्यक्तीला पूर्णतः विकारमुक्त होता येतउ. दुष्परिणामांना वावच राहत नाही असो.
1. युस्टीलॅगो- बीकोषदाहावर उपयुक्त विशेषतः डाव्या ओव्हरीमध्ये रक्त गाठ किंवा पाण्याची गाठ तयार होते. ओटीपोटाच्या डाव्या बाजूला असह्य वेदना होतात. पाळीच्या वेळेस खूप अंगावर जाते. महिनोन्महिने स्राव होतो. जरा हालचाल झाली तरी स्राव होतो. अगदी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला असला तरी या औषधाने त्रास पूर्ण कमी होतो.
2. लॅक कॅनीनम- उजव्या बीजकोषाचा दाह, ओटीपोटात भयंकर वेदना, अक्षरशः कापल्यासारख्या वेदना, घट्ट गाठीसारखा स्राव, मासिक पाळीच्या तक्रारी श्वेतप्रदर, दाह अशा तक्रारीवर उपयुक्त.
3 कार्बो अॅनिमॅलीस- मासिक पाळी जवळजवळ पंधरापंधरा दिवसांनीय येेते परंतु स्राव जास्त असत नाही. अतिशय अशक्तपणा, ओलण्याचीही शक्ती राहत नाही. विशिष्ट कर्करोगावर उपयुक्त पिवळट पांढरा स्राव. अंगातले त्राण गेल्यासारखे वाटणे अशा लक्षणांवर उपयुक्त.
शस्त्रक्रिया- हा विकार प्रजननक्षम वयात होणाराच आहे. तरीही काही वेळा काही विकारांवर फक्त औषधोपचाराने गुण येणारा नसतो. त्यावेळी शस्त्रक्रियेचा अवलंब करावाच लागतो. त्यावेळी मात्र वेळ हव श्रम वाया न घालवता शस्त्रक्रियेला सामोरे जाणेच श्रेयस्कर ठरते.
गर्भपात
गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यत गरोदरनपणाचा काळ हा नऊ महिने सात दिवस किंवा 36 ते 38 आठवड्यांचा असतो. त्याआधी म्हणजे सात महिन्यांच्या आत किंवा 28 आठवड्यांच्या आत जर गर्भ गर्भाशयातून बाहेर पडला तर त्याला गर्भपात म्हटले जाते. पहिल्या 12 आठवड्यातच याचा धोका व प्रमाण जास्त असते. काही रूग्धामध्ये वारंवार असा प्रकार घडल्याने वंध्यत्व येऊ शकते.
लक्षणे- प्रसूतीसदृश वेदना व रक्तस्राव होऊन गर्भ गर्भाशयातून बाहेर पउतो. कंबर व ओटीपोटात असह्य वेदना होतात. थोड्याथोड्या प्रमाणात रक्तस्राव चालू होऊन मग वाढत जातो. क्वचित रूग्ण दगावण्याचीही शक्यता असते.
कारणे- 1. गर्भाशय रचनादोष किंवा रचनाव्यंग (दुभंगलेले किंवा दुतोंडी गर्भाशय)
2. हायपोथॉयराईडजम
3. प्रोजेस्टेरॉनची कमतरता
4. ह्यूमन गोनाडोट्रॉफिन (एचसीजी) हार्मोनची कमतरता
5. ’वारे’ पासून तयार होणार्या घटकांची व रक्तपुरवठ्याची कमतरता.
6. काही ठराविक औषधांच्या चुकीच्या वापरामुळे
7. शारीरिक व मानसिक धक्क्यामुळे
8. शारीरिक संबंधामुळे
9. काही विशिष्ट रोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड निकामी होणे, मधुमेह, मानसिक आजार यामुळे
10. गर्भाशयात गाठी असल्यामुळे
11. गर्भामध्येच व्यंग किंवा न्यून असल्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
निदान- रक्त, लघवी यांची सुसूत्र तपासणी, रक्तशर्करा, रक्तदाब तपासणी, रक्तगट (पती पत्नी दोहोंचाही), एचआव्ही, पांढरी कावीळ, परमा, सोनोग्राफी या सर्व तपासण्या आजच्या धकाधकीच्या व नाजूक काळामध्ये आवश्यकच ठरल्या आहूत.
उपचार- गर्भपाताचे कारण एकदा ानक्की झाले की संभाव्य असणारा गर्भपातसुध्दा थांबवता येऊ शकतो. परंतु थांबवता न आल्यास वैद्यकिय परिमाणात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, एमटीपी) तसे न केल्यास रूग्ण दगावतो. हे शस्त्रक्रियेने किंवा नवीन आलेल्या औषधी गोळ्यांनीही साधता येते.
होमिओपॅथी-
1. सबीना- तिसर्या महिन्यात होणार्या गर्भपातावर उपयुक्त. अतिशय घट्ट, गाठीयुक्त रक्तस्राव, वेदनादायक हालचाल असह्य वेदना.
2. अकोनाईट- कमालीच्या भीतीमुळे होणार्या त्रासावर.
3. थायरॉईडिनम्- हायपोथाइरॉईडमुळे होणार्या गर्भपातावर उपयुक्त
4. ट्रिलीयम- होणारा गर्भपात थांबवण्यासाठी
5. फेरम मेट- अशक्त, बारीक रूग्णांसाठी उपयुक्त
6. अलेट्रिस फेरिनोसा- वारंवार गर्भपात होऊन वंध्यत्व आल्यास उपयोगी
7. डीएनए- कोणत्याही प्रकारच्या गर्भपातावर उपयुक्त. गर्भपात टाळण्यासाठी होत असलेला थांबवण्यासाठी तसेच वारंवार होणारी प्रक्रिया थांबवण्यासाठी अशी सर्वच प्रकारची औषधे होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत.
निसर्गोपचार- आवळा एक चमचा आवळयाचा रस व मध रोज सकाळी गर्भधारण झाल्यापासून घेतल्यास गर्भसंरक्षण होते. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही शिवाय आवळ्यामुळे आहारातील लोहाचे पचन उत्तम प्रकारे होते.
करडई- करडईच्या पाल्याचा काढासुध्दा खूप गुणकारी आहे.
इतर शारीरिक विश्रांती, मानसिक सौक्ष्य, गरोदरपणी विशेषतः पहिल्या पाच महिन्यात फार आवश्यक असते. माफक व्यायाम, योग्य आहार, शांत दिनचर्या यांचा खचितच उपयोग होतो. पहिल्या तीन महिन्यात फोलिक अॅसिडच्या पाच मि. ग्रॅ च्या गोळ्या घेतल्याने बाळाच्या मेंदूचाही विका होतो. शिवाय गरोदरपणही व्यवस्थित सांभाळले जाते. पूर्ण गरोदरपणात वैद्यकिय सल्ल्याने पोषके घेणे आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे.